पुणे | जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या वाबळेवाडीच्या शाळेचा कायापालट करणारे दत्तात्रय वारे गुरुजी अखेर दोषमुक्त झाले आहेत. पुणे जिल्हा परिषदेकडून नेमलेली चौकशी समिती यांनी वारे गुरुजींवर केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचही अहवालात समोर आलं आहे. दोन वर्षापूर्वी गावच्या राजकारणातून त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेकडून निलंबित करण्यात आलं होतं मात्र काही महिन्यांपूर्वी हे निलंबन मागे देखील घेण्यात आलं. त्यांनतर आंबेगाव तालुक्यातील जालिंदर वाडी या आदिवासीबहुल भागातील शाळेत त्यांची बदली करण्यात आली.
हीच ती बातमी आहे ज्यामुळे या विषयाला वाचा फुटली आणि अखेर वारे गुरुजींना न्याय मिळाला.
https://youtu.be/CdGk_sYTfKo?si=QuFOLaZbgPomYoXc
‘या‘ आरोपाखाली केलं होतं निलंबन
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून असं सांगण्यात आलं होत की, शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांचा समावेश असलेली शाळा विकास समिती वाबळेवाडीत काम करत होती. शाळेसाठी ही समिती ऐच्छिक स्वरुपात देण्यात येणाऱ्या देणग्या स्वीकारत होती मात्र देणग्या स्वीकारताना त्याचा व्यवस्थित हिशोब या समितीने ठेवला नाही म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दत्तात्रय वारे यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
दत्तात्रय वारेंवर स्थानिक राजकारणामुळे विविध आरोप देखील करण्यात आले होते. गावकऱ्यांनी लाखो रुपये जमा करून काही कंपन्यांकडून निधी मिळवला व त्याचा हिशोब ठेवला. मुख्याध्यापकांचा यामध्ये काहीच संबंध नाही परंतु, ओढून-ताणून त्यांना या आर्थिक व्यवहारात जबाबदार धरलं आणि त्यांचं निलंबन केलं असं स्थानिकांनी म्हटलं आहे.
ही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचीच – दत्तात्रय वारे गुरुजी
जेव्हा त्यांचं निलंबन रद्द झालं तेव्हा त्यांची नियुक्ती आंबेगाव तालुक्यातील जालिंदरवाडी या गावातील शाळेत झाली. त्यांनी जसा वाबळेवाडीच्या शाळेचा कायापालट केला अगदी तसाच याही शाळेचा केला. एवढच नाही तर त्यांनी ही शाळा खासगी शाळेलाही मागे टाकत आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण करू शकणारी आहे असा विश्वास दिला.