नागपूर | शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या महायुती सरकारला एक प्रश्न सातत्याने विचारला जातो तो म्हणजे बिहारनंतर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना होणार का? यावर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण भाजप पक्षाद्वारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपच्या ओबीसी जागर यात्रेत त्यांनी राज्यातील ओबीसींची जनगणना करण्यात यावी अशी मागणी महायुती सरकारला करणार अशी घोषणा केली.
बिहारमध्ये नीतीश कुमार सरकारने जातनिहाय जनगणनेचा अहवाल जारी केला आहे. बिहारमध्ये ओबीसींच्या जातनिहाय गणनेचा अहवाल सादर होताच राज्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पक्ष म्हणून महायुती सरकारकडे ओबीसींची जात निहाय गणना करण्याची मागणी करेल असे जाहीर केले.
भाजपचे नेते आशिष देशमुख यांनीही महाराष्ट्रातही ओबीसीच्या विविध जातींचा सर्वे करावा अशी मागणी केली होती. आधीच महाराष्ट्र विधानसभेने एकमुखाने ओबीसी आणि इतर जातीच्या गणण्याची मागणी केलेली आहे. बिहारच्या या जातनिहाय गणनेनंतर बावनकुळे यांना विनंती करत आपण सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहात, आपण महाराष्ट्रामध्ये ओबीसीमधील विविध जातींचा सर्वे करून आकडे जाहीर करण्याची मागणी सरकारकडे करावी अशी विनंती त्यांनी केली होती.
दरम्यान, आशिष देशमुख यांनी मागणी केली आहे की, महाराष्ट्र सरकारने ओबीसींचा सामाजिक आर्थिक स्टॅटिस्टिक डेटा जाहीर करावा. ओबीसींची संख्या किती आहे याचा डेटा राज्य सरकारने सर्वे तयार करून तो जाहीर करावा, यासंदर्भात आम्ही राज्य सरकारला विनंती करू असे बावनकुळे म्हटले आहे.