मुंबई | महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे ओएसडी म्हणून प्रदीप सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सानप यांची त्यांच्या कार्यालयीन जागेवर उसनवारी तत्वावर दि. २७ ऑक्टोबरपासून ‘विशेष कार्य अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत दि. २१ ऑक्टोबर २०२३ च्या पत्रानुसार सानप यांची “विशेष कार्य अधिकारी म्हणून उसनवारी तत्वावर नियुक्ती करण्याबाबतचे कार्यालयीन आदेश निर्गमित करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत. या शासन निर्देशानुसार महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेचे अनिल फड यांनी हा नियुक्ती आदेश काढला आहे.