लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या लायन्स सखी मंचतर्फे आयोजन
पुणे | पुण्यातील गंगाधाम येथील राजयोग लॉनमध्ये ५ फेब्रुवारीला लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या सखी मंचतर्फे लायन्स लेडीज प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवडमधील रॉकर्स संघानं विजय मिळवला. यावेळी कुशल लँडमार्क्स शार्कस या संघाला नमवत रहाटणी रॉकर्स संघानं 10 विकेट्सनं विजय मिळवला. विजयी रहाटणी रॉकर्स संघाला चषक आणि 31 हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं तर उपविजेत्या कुशल लँडमार्क्स शॉकर्स संघाला चषक आणि 11 हजार रुपयांचं बक्षिस देण्यात आलं.
या स्पर्धेत नाशिक, मालेगाव, लोणावळा, पिंपरी चिंचवड आणि पुणे या जिल्ह्यांतील एकूण १२ संघ तसेच १७० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते… स्पर्धेतील विजयी संघाला तसेच उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. सांघिक बक्षिसांसोबतच या स्पर्धेत विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विविध बक्षिसे देऊन अभिनंदन करण्यात आले. खेळाच्या वूमन ऑफ द सिरीज प्रज्ञा देवकाते यांना ट्रॉफी व वॉशिंग मशीन भेट देण्यात आले.
या स्पर्धेच्या आयोजनात सखी मंचच्या अध्यक्षा लायन भारती भंडारी, लायन सुवर्णा दोशी, लायन सुजाता शहा, लायन प्रियांका परमार, लायन शीतल गदिया, लायन कविता अग्रवाल आणि संपूर्ण सखी मंच टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. माधुरी मिसाळ यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले. जीतो अपेक्सचे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, जीतो लेडीज विंगच्या चेअरपर्सन संगीता ललवाणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी, सीईओ लायन श्याम खंडेलवाल, सचिव लायन अशोक मिस्ट्री, खजिनदार लायन राजेंद्र गोयल, जीतो पुणे चॅप्टरचे चेअरमन राजेश सांकला, मुख्य सचिव चेतन भंडारी, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन अरुण शेठ, डिस्ट्रिक्ट आदी मान्यवर आणि सखी मंचचे सदस्य, 12 संघांचे संघमालक, प्रशिक्षक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर सर्व उपस्थित खेळाडू आणि सदस्यांनी झुम्बा डान्स करत व्यायाम केला. आणि सर्व संघातील खेळाडूंनी सुंदर परेड सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर खेळाडूंनी फुगे हवेत सोडत स्पर्धेला सुरुवात केली.
महिलांनी क्रिकेटचा आनंद लुटत इतिहास रचला
“महिलांना खेळात संधी मिळावी आणि त्यांचे सशक्तीकरण व्हावे या उद्देशाने आयोजित केलेल्या या लेडीज प्रीमियर लीग मध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या. खेळाचा आनंद घेत स्पर्धा करीत त्या क्रिकेट खेळल्या. यातून निकोप स्पर्धा कशी करावी याचे धडे सर्वांनाच मिळाले. नेहमीच पुरुषांसाठी स्पर्धा आयोजित होतात. परंतु, लायन्स सखी मंच ने महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करून इतिहास रचला आहे. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!”
- विजय भंडारी (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर)