पुणे : नाविन्यपूर्ण कल्पना, धोरणात्मक गुंतवणूक व इकोसिस्टम मजबूत करण्याच्या उद्देशाने एआयसी पिनॅकल आणि जीतो पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिफ (JIIF) स्टार्टअप एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील एमसीसीआयए (MCCIA) ट्रेड सेंटर येथे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये २०० हून अधिक नवोदित उद्योजकांमधून निवडलेल्या ३० हून अधिक नविन उद्योगांचे प्रतिनिधी आपल्या व्यवसायाचे सादरीकरण करणार आहेत.
या एक्स्पोमध्ये सहभागी होणाऱ्या उद्योजकांना भेटून त्यांची उत्पादने पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक निधी गोळा कसा करावा? व्यवसायाचं मूल्यांकन व सादरीकरण करत असताना कोणकोणत्या अडचणी येतात याबद्दल माहिती देण्यात येणार आहे. या एक्स्पोच्या माध्यमातून जुन्या व नवीन व्यवसायाचे ट्रेडमार्क किंवा आयपी विनामूल्य मिळवण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी जीतो अपेक्स चे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल व जिफ (JIFF) चे उपाध्यक्ष जिनेंद्र भंडारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. तर, या एक्स्पोच्या आयोजनामध्ये जीतो पुणेचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, मुख्य सचिव चेतन भंडारी, जीतो अपेक्स श्रमण आरोग्यमचे उपाध्यक्ष व जीतो युथ विंगचे मार्गदर्शक विजय भंडारी, अपैक्स जिफ (JIIF) चे सचिव सुजित भटेवरा, जिफ (JIIF) कमिटीचे ऋषभ सांकला, विक्रम परमार, युथ विंगचे अध्यक्ष निकुंज ओसवाल, मुख्य सचिव सिद्धार्थ गुंदेचा, जिफ (JIIF) च्या समन्वयक ईशा ओसवाल, हर्षल बाफना, मिशांक रांका, आदित्य छाजेड, एआयसी पिनॅकलचे संस्थापक डॉ. सुधीर मेहता, सीईओ सुनील धाडीवाल यांचे विशेष योगदान आहे. या एक्स्पोमध्ये रवींद्र सांकला, अजय मेहता, उमेश बोरा, सुदेन्दू शाह, सुजय शाह, अभिषेक भटेवरा यांच्यासह अर्थ्यन व इंडियन एंजेल नेटवर्क या संस्था गुंतवणूक करणार आहेत.
या एक्स्पोमध्ये सहभागी होऊन उद्योजकांना भेटण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी https://forms.gle/btUHGAghosDWSfqHA या लिंकद्वारे आजच नोंदणी करा, असे आवाहन करण्यात आले आहे.