नांदेड । नांदेड जिल्हाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडताना दिसून येत आहे. राज्याचे माजी मुखमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना लगेच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर काँग्रेसमधून अनेक भाजापत जाणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अशातच नांदेड जिल्ह्यातील एक मोठं नाव लोहा- कंधार विधानसभेचे शेकापचे आमदार यांच्या पत्नी शेकपाच्या प्रदेशाध्यक्षा आशा श्यामसुंदर शिंदे ह्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आशा श्यामसुंदर शिंदे या भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या बहीण आहेत.
आशा शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यास येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत बहीण भावाची लढत होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, सध्या नांदेड जिल्ह्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. यातच आशा शिंदे या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार असून चर्चा करणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय.अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे प्रतापराव चिखलीकरांचा पत्ता कट होणार का, अशी चर्चा सुरू होती. भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीत प्रतापराव चिखलीकर यांनी उमेदवारी सांगितली आहे. तर, आता प्रतापराव चिखलीकर यांची बहिण आशा शिंदे कॉंग्रेसमधून लोकसभा लढणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या आशा शिंदे या पत्नी आहेत. तर प्रतापराव चिखलीकर यांच्या बहिण आहेत. यातच आज आशा शिंदे नाना पटोले यांची भेट घेणार असून चर्चा करणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय.