महायुतीसमोर दिवसेंदिवस नवनवीन आव्हानं उभी राहत आहेत. जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.. ज्या जागांवर उमेदवार जाहीर केले त्या उमेदवारांना पक्षांतर्गत विरोध केला जात आहे…अनेक जणांचं नाराजीनाट्य सुरु आहे. यापैकी तीन नेते असे आहेत की जे काही केल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना दाद देईनात. महायुतीच्या उमेदवारांना त्यांचा विरोध कायम असून तडजोडीस तयार नाहीत. त्यामुळं शिंदे-फडणवीस-पवार यांचं टेन्शन वाढवणारे हे तीन नेते नेमके कोणते आहेत. महायुतीकडून त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार? की त्यांचं बंड थंड होणार. हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेउयात..
शिंदे-फडणवीस-पवारांचं टेन्शन वाढवणाऱ्या तीन नेत्यांपैकी पहिला नेता आहे बारामती लोकसभा मतदारसंघातला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या माजी मंत्री व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतलीय. आणि कोणत्याही परिस्थितीत आपण ही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं शिवतारे ठामपणे सांगत आहेत. त्यांनी माघार घेण्यास नकार दिलाय…
दुसरे नेते आहेत बच्चू कडू… माजी मंत्री बच्चू कडूंचा प्रहार पक्ष महायुतीतील घटक पक्ष आहे, मात्र त्यांनी पश्चिम विदर्भातील पाच पैकी एका मतदारसंघातून प्रहारचा खासदार निवडून येईल असा दावा केलाय. प्रहारचा अमरावती लोकसभा मतदारसंघावर भर असल्याचं स्पष्ट झालंय. सगळ्या पक्षांचे दहा-बारा आमदार फूटले मात्र आमचे दोन आमदार होते आणि दोन्ही ५ वर्षे टिकून आहेत, कारण आम्हाला ईडीची काही भीती नाही, कोणती चौकशी लावणार तुम्ही, असं म्हणत महायुतीविरोधात बच्चू कडू आक्रमक आहेत. ईडीची भीती नसल्याचं सांगत बच्चू कडूंनी त्यांची भूमिका कायम ठेवली आहे.. इतकंच नाही तर वेळ पडल्यास महायुतीतून आपण बाहेर पडू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे..
धैर्यशील मोहिते पाटील हे देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मोहिते पाटील हे तिसरे नेते आहेत ज्यांनी महायुतीच्या सगळ्याच नेत्यांचं टेन्शन वाढवलंय. माढा लोकसभेची निवडणूक ही कायम प्रतिष्ठेची मानली गेली आहे. निंबाळकर आणि मोहिते-पाटील ही मात्तबर घराणी या मतदारसंघात आहेत..रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिल्याने धैर्यशील मोहिते पाटील कमालीचे नाराज आहे. मोहिते पाटील यांच्या राजकारणाच्या भविष्याचाच प्रश्न निर्माण होणारी परिस्थिती असल्याने मोहिते-पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धारच केला आहे..