पुणे | पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणूनही ओळखलं जातं. या शहराने कायमच औद्योगिकीकरण, संस्कृती जपली आहे. पूर्वीच्या काळात पुण्याची ओळख ऑटो मोबाईलची नगरी म्हणूनही होती. कालांतराने शिक्षणासाठीचं शहर म्हणून पुणे अधिक परिचित झालं. आता आयटी क्षेत्रातही पुणे शहर मागे राहिलं नाही. पुणे हे आर्थिक केंद्र होण्यासाठी इथे विकास होणे गरजेचे आहे.
पुण्यात रस्त्याचे रुंदीकरण, मेट्रो, राबवलेल्या उपक्रमांसाठीचे नियोजन व व्यवस्था, लहान-मोठ्या व्यावसायिकांना व्यवसायाची संधी, त्याबरोबरच जास्तीत जास्त उद्योग(इंडस्ट्री), उद्योगाला चालना देण्यासाठी लागणाऱ्या सुविधा, प्रदूषणमुक्त पुणे या सर्व गोष्टींचा विचार पुण्याच्या खासदाराने करायला पाहिजे. पुण्याचा खासदार संस्कृती जपणारा, कायदा आणि सुव्यवस्था राखणारा हवा आहे. याशिवाय पुण्याला प्रभावी नेतृत्व हवं आहे. येणाऱ्या काळात पुण्याला नवी दिशा देणारा, जास्तीत जास्त विकास कामे करणारा खासदार लाभला तर पुण्याची उन्नती होईल.
दरम्यान, रिटायरमेंट होम अशीही पुण्याची ओळख सांगता येईल. अनेक नागरिक रिटायर झाल्यानंतर पुण्यालाच स्थायिक होतात. त्यांच्यासाठी सुव्यवस्था आणि संस्कारयुक्त पुणे करणारा खासदार हवा आहे..याव्यतिरिक्त पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढत चालली आहे त्यामुळे होणाऱ्या नव्या खासदाराने गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी अधिकाधिक उपाययोजना आणि मार्ग शोधणं गरजेच आहे असे मत बी.जे. भंडारी पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय भंडारी यांनी व्यक्त केले आहे.
२०२४ पुणे लोकसभा निवडणुकीतील अधिकृत उमेदवार
मुरलीधर मोहोळ – भाजप
रवींद्र धंगेकर – काँग्रेस
वसंत मोरे – वंचित बहुजन आघाडी