पंढरपूर | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विठ्ठल गणेशोत्सव परिवार यांच्या वतीने गणेशोत्सव आणि गौरी गणपती यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये पंढरपूर शहरातील सर्व गणेश मंडळांनी आणि गौरी गणपती महालक्ष्मी सर्वोत्कृष्ट सजावट करणाऱ्या कुटुंबाने यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे.
स्पर्धेतील प्रथम विजेत्यास 51 हजार रुपये, द्वितीय 41 हजार आणि तृतीय विजेत्यास 31 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा दिलीप धोत्रे यांनी केली आहे.