पुणे : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या वतीने ‘विजयगाथा’ या सहाव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार (दि. 18 मे) व रविवार (दि. 19 मे) या दोन दिवस झालेल्या कॉन्फरन्समध्ये विविध विषयांवर मंथन करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 मधील विविध समित्यांनी आपला वार्षिक अहवाल सादर केला. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ लायन विजय भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉन्फरन्सला प्रमुख अतिथी म्हणून पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर एमजेएफ लायन डॉ. विनोद कुमार लडिया, पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर एमजेएफ लायन प्रेमचंद बाफना, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. एस. के. जैन, डिस्ट्रिक्ट सीईओ लायन शाम खंडेलवाल, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी लायन अशोक मिस्त्री, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ट्रेझरर एमजेएफ लायन राजेंद्र गोयल, लायन्स सखी मंचच्या अध्यक्षा लायन भारती भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
विजयगाथा या सहाव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सचे उद्घाटन शनिवारी (दि. 18 मे) दुपारी 3 वाजता प्रमुख अतिथींच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर प्रमुख अतिथींनी उपस्थित लायन सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ लायन विजय भंडारी यांनी गेल्या वर्षभराच्या कामाचा अहवाल सादर करत लायन सदस्य व त्यांच्या टीमचे आभार मानले. यानंतर कार्यक्रमात नियम समिती, नोंदणी समिती, ठराव समिती, घटना व उपविधी समिती, नामनिर्देशन समिती व निवडणूक समिती यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी यांच्याकडे अहवाल सादर केला. शनिवारी (दि. 18 मे) रात्री उपस्थित सदस्यांसाठी लायन्स गॉट टॅलेंट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लायन सदस्यांनी विविध कला सादर करत उपस्थितांचे मनोरंजन केले.
कॉन्फरन्सच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (19 मे) सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पिकर सोनू शर्मा यांनी उपस्थित लायन सदस्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठीच्या काही प्रमुख गोष्टींबाबत मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते लायन रघुनाथ ढोले यांच्या वसुंधरा संवर्धनाच्या कार्याचा सन्मान करत त्यांना लायन भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय लायन सदस्यांसाठी विशेष लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 7 लायन सदस्यांना विविध बक्षीसे भेट देण्यात आली.
या कॉन्फरन्सवेळी आगामी वर्षासाठी इंटरनॅशनल डिरेक्टर एन्डोरसी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 1, व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2 या 4 पदांसाठी निवडणूक पार पाडली. यावेळी उपस्थित 549 लायन सदस्यांनी मतदान केले. निवडणुकीत इंटरनॅशनल डिरेक्टर एन्डोरसी या पदासाठी लायन जितेंद्र मेहता, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर या पदासाठी लायन विजय सारडा, व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 1 या पदासाठी लायन राजेश अग्रवाल आणि व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2 या पदासाठी लायन श्रेयस दिक्षित यांची निवड झाली. प्रमुख अतिथी व उपस्थित लायन सदस्यांनी नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
प्रेमानं जग जिंकता येतं तसंच कामेही प्रचंड करता येतात!
“प्रेमाने जग जिंकता येते तसेच प्रेमाने मोठ्या प्रमाणात कामंही करता येतात. हेच गेल्या वर्षभरात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून मी अनुभवत आहे. सामाजिक कार्यासाठी जगविख्यात असलेल्या लायन्स इंटरनॅशनल क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ च्या लायन सभासदांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. याबरोबरच सामाजिक कार्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे. प्रत्येकामध्ये मला त्यासाठी दानत दिसली. या सर्वांमुळेच विजयगाथा होऊ शकली. सहाव्या डिस्टिक्ट कॉन्फरन्सच्या निमित्ताने लायन सदस्यांनी आपले विचार शांतीप्रिय मार्गानी मांडले आणि गेल्या वर्षभरात लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध सेवाभावी कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. सोबतच आगामी वर्षांसाठी डिस्ट्रिक्ट 3234 डी2 मधील महत्त्वांच्या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही निवडणूक अतिशय शांतीप्रिय मार्गाने पार पडली. यामध्ये लायन जितेंद्र मेहता, लायन विजय सारडा, लायन राजेश अग्रवाल, लायन श्रेयस दिक्षित यांची निवड झाली. या सर्व विजय उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!”
— एमजेएफ लायन विजय भंडारी
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2