पुणे | लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 अंतर्गत लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंड्सच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण महिना साजरा करण्यात येणार आहे. ज्यामध्ये दिनांक ५ जून ते २० जून दरम्यान इंद्रधनुष्य पर्यावरण आणि नागरिकत्व केंद्र म्हात्रे पुल राजेंद्रनगर पुणे याठिकाणी देशी बियांचे प्रदर्शन, वनस्पती ग्रंथालय, देवराई मॉडेल सादरीकरण, घनदाट जंगल ‘घनवन’, कचऱ्याचे पृथक्करण, बियाणे उगवण डेमो, रोपं दान यांसारखे प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
तर, ८ जून ते १० जून रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पाणी आणि मातीवरील क्रियाकलापाचे प्रदर्शन, वनस्पती ग्रंथालय, देवराई मॉडेल सादरीकरण, घनदाट जंगल ‘घनवन’ टेरेस गार्डन प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यामध्ये देवराई प्रोजेक्टचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन रघुनाथ ढोले यांच्या सहकार्याने जवळपास २००० हून अधिक रोपं वाटप करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर, पुण्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण, स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम, ई-कचरा संकलन ड्राइव्ह, वैयक्तिकरित्या कार्बन उत्सर्जन कमी करणे यावर ऑनलाइन सत्र, जुने कपडे दान, पर्यावरण जनजागृती स्टॉल, उडणारे बियाणे क्रियाकलाप, टेकडी स्वच्छता, नदी स्वच्छता अभियान, तलाव स्वच्छता अभियान आणि वनस्पती ग्रंथालय असे अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहे.
तसेच या उपक्रमासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 चे प्रांतपाल एमजेएफ लायन विजय भंडारी, डिस्ट्रिक्टचे सीईओ लायन श्याम खंडेलवाल, सचिव लायन अशोक मिस्त्री, खजिनदार लायन राजेंद्र गोयल यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी, देवराई प्रोजेक्टचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन रघुनाथ ढोले यांना ९८२२२४५६४५, प्रदर्शनाचे को-ओर्डीनेटर लायन विश्वास सूर्यवंशी यांना ९३५९६५७०९८, लायन्स क्लब ऑफ ईको फ्रेंड्सचे अध्यक्ष लायन किशोर मोहोळकर यांना ९३२६१८६८५९ तर क्लबचे सचिव लायन रमेश पसरेजा यांना ९८२२०६१२०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.