लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.१२ जुलै रोजी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार याबाबत भाजपने १० नावं निश्चित केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या यादीत दोन महिला नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ या दोन महिला नेत्यांच्या नावाचा या यादीत समावेश आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने १० नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे. तर भाजपच्या कोट्यातून महादेव जानकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
1) पंकजा मुंडे
2) हर्षवर्धन पाटील
3) रावसाहेब दानवे
4) चित्रा वाघ
5) अमित गोरखे
6) परिणय फुके
7) सुधाकर कोहळे
8) योगेश टिळेकर
9) निलय नाईक
10) माधवी नाईक
केंद्रात पाठवण्यात आलेल्या यादीत या १० नावांचा समावेश आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेस नेते कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा पराभव केला. १९९९ पासून खासदार असेल्या रावसाहेब दानवे यांचा जालन्यात दारूण पराभव झाला. त्यानंतर रावसाहेब दानवे यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार असल्याची माहिती आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यंदा लोकसभेच्या रिंगणात होत्या. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून त्यांनी निवडणूक लढवली.पण त्यांचा पराभव झाला..पराभवामुळे अनेक मुंडे समर्थकांनी आत्महत्या केली. त्यामुळे बीडचं राजकीय वातावरण तापून निघालं.त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार का?, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. अशातच विधान परिषदेच्या उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं हे राजकीय पुनर्वसन असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.