महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन राजधानी मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी NDVI च्या फुल फॉर्म वरून सभागृहात विरोधकांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडेंना घेरलं. परंतु, मुंडेंना घेरण्याआधी नेमकं काय घडलं ते सुद्धा समजून घेऊयात.शेतकऱ्यांना मदत निधी कधी मिळेल यावरून विरोधकांनी मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना प्रश्न विचारले.त्यावर मंत्री अनिल पाटलांनी हा मुद्दा कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडे टोलवला आणि पुढं जे घडलं ते आपण या व्हिडिओतून पाहुयात..
अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार यावरून सभागृहामध्ये चर्चा सुरु असताना मदतीच्या निकषांची मंत्र्यांना तरी माहिती आहे का असा मुद्दा चर्चेत आला. NDVI च्या निकषानुसार १५ जुलै पर्यंत मदत देऊ असं आश्वासन मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलं. मात्र NDVI आहे तरी काय असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. विरोधकांच्या या प्रश्नानं बराच वेळ खल रंगला होता.