राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात, सेतू केंद्रांवर महिला प्रचंड गर्दी करू लागल्या आहेत.या योजनेच्या अटी-शर्थीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता.त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल करण्यात आल्याचं सांगितलं.नेमके कोणते नियम शिथिल बदल करण्यात आले आहेत. काय बदल करण्यात आला आहे? या योजनेचा आता नेमका कुणाला लाभ होणार आहे? हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.
अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत जाणून घेऊयात…
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले-स्टोअर वरुन Narishakti Doot नावाचं राज्य सरकारनं तयार केलेलं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि ते Install करायचं आहे. ते केलं की पुढे या application विषयी माहिती दिलेली दिसेल. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याखालच्या terms and conditions accept करायच्या आहेत. मग लॉग-इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. तो टाकून Verify OTP वर क्लिक करायचं आहे. मग तुमची प्रोफाईल पूर्ण करायची आहे. यात अर्जदार महिलेचं पूर्ण नाव, ई-मेल आयडी टाकायचा आहे. पुढे जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार (सामान्य महिला, बचतगट अध्यक्ष/सचिव/सदस्य, गृहिणी, ग्रामसेवक) निवडायचा आहे. मग अपडेट करा पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग नवीन पेज ओपन होईल. इथं स्क्रीनवर दिसणाऱ्या नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर योजनेचा अर्ज ओपन होईल. यात सुरुवातीला अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव, पती किंवा वडिलांचे नाव, जन्म दिनांक टाकायचं आहे. पुढे अर्जदाराचा पत्ता, यात जन्माचं ठिकाण- जिल्हा, तालुका, गाव किंवा शहर, ग्रामपंचायत किंवा महापालिकेचं नाव आणि पिनकोड टाकायचा आहे. मग पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आधार क्रमांक टाकायचा आहे. शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेता का, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. होय किंवा नाही, असं हे उत्तर द्यायचं आहे. होय असेल तर लाभाची रक्कम तिथं नमूद करायची आहे. पुढे लाभार्थ्यांची वैवाहिक स्थिती निवडायची आहे. अर्जदार महिलेनं अविवाहित, विवाहित,विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित इ.पैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे. यात बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचं नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकायचा आहे. आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का, असा प्रश्न तिथं असेल. हो किंवा नाही ते उत्तर निवडायचं आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तो लिंक करुन घ्यायचा आहे. यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. अर्जदाराचा फोटो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे…कॅमेरा सुरू होईल आणि मग फोटो काढायचा आहे. Accept हमीपत्र या पर्यायावर क्लिक करुन खालील स्वीकारा या पर्यायावर क्लिक आहे आणि मग माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल, ती माहिती वाचून फॉर्म सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाकला की तुमचा फॉर्म सबमिट होईल. अशाप्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया नुकतीच सुरू झाल्यामुळे अर्ज भरताना काही वेळेस तुम्हाला अडचण येऊ शकते.