पुणे शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्याच्या सखल भागात पडलेल्या अविरत पावसामुळे सर्व परिसर जलमय झाला असून अशा परिस्थितीत पुण्याच्या नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीवरुन लष्कराच्या बचाव आणि मदत कार्य पथकाने एकता नगरच्या दिशेने प्रयाण केले. या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी कृती दल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असून या पथकासोबत आपत्तीने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी तसेच तत्पर आणि परिणामकारक मदतकार्यासाठी आवश्यक बचाव बोटी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा साधने आहेत. लष्कराच्या मदतीने अनेक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
जोरदार पावसाने पुण्यात कहर माजवला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळपासूनच सूत्रे हाती घेतली. तर दुसरीकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फ़ोन केला. उद्याची सुट्टी आजच जाहीर करा. उद्या ऐनवेळी अडचण नको त्यामुळ आज संध्याकाळ पर्यंत जाहीर करा. आज जशी अडचण झाली तशी उद्या होवू नये अशा सूचना त्यांनी दिल्या.आता पुण्यात पाऊस पूर्णपणे थांबला आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पाणी ओसरलं आहे. सिंहगड रोड परिसरातील काही भागात आज सकाळी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. मात्र आता सिंहगड रोड परिसरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात देखील पावसाने हाहाकार माजवला. पिंपरी चिंचवडच्या चिखली मधील घरकुल येथील इमारतींमध्ये पाणी शिरले. सखल भागात गुडघ्याहून अधिक पाणी साठलेले आहे. अनेक वाहनं पाण्याखाली गेली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास इमारती मधल्या घरांमध्येही पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरकुल मध्ये 160 इमारती असून त्यातील जवळपास 40 ते 50 इमारतीच्या भागात पाणी शिरल्याने नागरिक हैराण झाले आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशानाकडून देण्यात आला आहे.