पुणे । पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी महाराष्ट्र टाइम्सच्या सुनीत भावे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरचिटणीसपदी सकाळच्या मीनाक्षी गुरव,उपाध्यक्षपदी लोकमतचे श्रीकिशन काळे आणि न्यूज 18 लोकमतचे चंद्रकांत फुंदे,खजिनदारपदी पुढारीचे शिवाजी शिंदे, चिटणीसपदी सकाळचे सचिन गोरे आणि पुढारीच्या हिरा सरवदे यांची निवड झाली आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाची सन २०२४-२५ या वर्षासाठी निवडणूक आणि मतमोजणी झाली.यात कार्यकारिणी सदस्यपदी लोकमत डिजिटलच्या अश्विनी केदारी, महाराष्ट्र टाईम्सचे श्रीकृष्णा कोल्हे, लोकमतचे ज्ञानेश्वर भोंडे, महाराष्ट्र टाईम्सचे प्रसाद पवार,एबीपी माझाचे मिकी घई, सकाळ – सरकारनामाचे सुदेश मिटकर, केसरीचे अनिल खुडे, प्रभातचे श्रीकृष्ण पादीर, लोकसत्ताचे संजय सपकाळे, दैनिक भास्करचे यशवंत सिंह यांची निवड झाली आहे. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड.प्रताप परदेशी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड.स्वप्नील जोशी यांनी काम पाहिले.