एकमेकांना खिंडीत गाठण्याची एकही संधी न सोडणारे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या दोन बड्या राजकीय प्रस्थापितांमधलं विळ्या-भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर दक्षिण मधून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आणि लोकसभेला सुजय विखेंचा पराभव झाला. दरम्यान लोकसभेतील पराभवानंतर सुजय विखे पाटील यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संगमेनर किंवा राहुरीतून आपण लढण्यास इच्छुक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. विशेषतः संगमनेर विधानसभा मतदारसंघातून ते रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे असं झाल्यास बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील असा सामना होण्याची शक्यता आहे. कारण अशी दोन महत्वाची कारणं आहेत ज्यामुळे विखे थोरातांच्या विरुद्ध शड्डू ठोकू शकतात. ही दोन कारणं नेमकी कोणती? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत…