लोकसभेला काँग्रेसला मोठं यश मिळालं. यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. विधानसभेला देखील आपल्याला यश मिळेल अशी खात्री काँग्रेसला आहे. विधानसभेला जास्तीत जास्त जागांवर विजय मिळावा यासाठी काँग्रेस तयारीला लागली आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने वॉर रूम प्रभारींची नियुक्ती केली आहे. हरियाणाची जबाबदारी गोकुळ बुटेल यांच्यावर असेल तर महाराष्ट्राची जबाबदारी तामिळनाडूचे खासदार शशिकांत सेंथिल यांच्यावर असणार आहे.
यामध्ये निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार आहे. तसेच विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर देणं ही वॉर रूमची जबाबदारी असेल. नागरिक आणि पक्षातील समन्वय साधण्यासाठी वॉर रूमची गरज असते. वॉर रूमच्या मदतीने उपक्रमांचे नियोजन करणे, सोशल मीडिया टीम सांभाळणे, प्रचाराविषयी नियोजन करणे अशी अनेक कामे वॉर रूमच्या मदतीने केली जातात. महाराष्ट्राच्या वॉर रूम प्रभारी ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते शिशिकांत सेंथिल कोण आहेत हे जाणून घेउया. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडू मधील तिरुवल्लूर लोकसभा मतदारसंघातून शिशिकांत सेंथिल हे विजयी झाले. शशिकांत हे आयएएस अधिकारी होते त्यांनी यूपीएससी परीक्षेत ९वा रँक मिळवला होता. कर्नाटकमध्ये पोस्टिंग होती परंतु त्यांनी २०१९ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देत २०२० मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०२१ मध्ये त्यांच्यावर तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या सेंट्रल वॉरची जबाबदारी देण्यात आली होती.