महाराष्ट्रासह इतर तीन राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्र्र, जम्मू काश्मीर, हरियाणा आणि झारखंड या राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. परंतु काल १६ ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. परंतु महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर न केल्याने शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचं मुख्य कारण म्हणजे १५ ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण केले यावेळी त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा उल्लेख केला. परंतु निवडणूक आयोगाने चार राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांपैकी फक्त दोन राज्यातील निवडणूका जाहीर केल्याने शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना सर्व देशांच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली होती. मात्र ती भूमिका मांडून काही तास होत नाहीत तरच आपल्याला ऐकायला येतं की, जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाली, हरियाणाची झाली. मात्र महाराष्ट्र आणि झारखंडची विधानसभा निवडणूक जाहीर झालेली नाही. देशात एकाच वेळी निवडणुकी घ्यायचं धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडत असताना महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भातील निवडणूक आयोगाचा निर्णय एकप्रकारचा विरोधाभास आहे, असं म्हणत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.