गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून जय पवार बारामती विधानसभा निवडणूक लढवणार का? अशी चर्चा सुरु होती त्यावर आता जय पवारांनी एक सूचक विधान केलंय. विधानभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राजकीय हालचालींना आता वेग येऊ लागला आहे. सर्वच राजकीयपक्षाच्या नेत्यांचे राज्यात विविध दौरे सुरु आहेत आणि याच पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदार संघाचा आढावा घेतला जातोय. तसेच त्याप्रकरची रणनीतीही आखली जात आहे.आणि कोण कोणत्या मतदारसंघामधून निवडणूक लढवणार? याबाबतची चाचपणीही सुरु आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची राज्यभर जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज ही जनसन्मान यात्रा बारामतीत होती. यावेळी जय पवार यांच्या नेतृत्वात बारामतीत मोठी रॅली काढण्यात आली. त्यामध्ये बोलताना जय पवार म्हणाले की ‘जनसन्मान रॅलीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज या कार्यक्रमासाठी पक्षाचे सर्वच नेते उपस्थित आहेत’. तसेच काही दिवसांपूर्वी ‘आपल्याला निवडणुकीत रस नसून, या आधी मी तिथून सात ते आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलो आहे’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.अजित पवारांच्या या विधानानंतर बारामतीमधून जय पवार निवडणूक लढविणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अखेर याबाबत अगदी मोजक्या शब्दांत तसेच सुचक विधान जय पवारांनी केलं. बारामती विधानसभेसाठी इच्छुक आहात का? असा प्रश्न जय पवार यांना विचारण्यात आला असता ‘माझी इच्छा ही अधिपासूनच सर्वांना मदत करण्याची आहे. अजित पवारांनी मतदारसंघात ज्या प्रकारे काम केलं आहे. त्या प्रकारे लोकांचे कामं करायची आहेत’ असं जय पवार यांनी म्हटलं आहे.