पुणे। दि पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन आणि रोटरी क्लब पुणे शनिवार वाडा यांच्या उपक्रमातंर्गत रविवारी दिनांक २० ऑक्टोबर २०२४ सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थातर्फे ४०० दृष्टीबाधित व्यक्तींना दिवाळी निमित्ताने धान्य वाटप करण्यात आले. दि पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनच्या नांदेड फाटा येथील वृद्धाश्रमात झालेल्या कार्यक्रमात पुणे शहर आणि जवळच्या परीसरातील ४०० दृष्टीबाधित व्यक्तींना हा आनंदाचा शिधा देण्यात आला. दि पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेशभाई शहा यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी काश्मिरा ठाकर तसेच रोटरी क्लब पुणे शनिवार वाडाचे प्रेसिडेंट शंतनू जोशी, सेक्रेटरी जोशी आणि नारायण चांडक उपस्थित होते.
दृष्टीबाधित व्यक्तींची ‘दिवाळी’ आनंदाची व्हावी यासाठी गेली अनेक वर्षे हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला जात आहे. दि पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन ही सामाजिक संस्था गेली 1952 पासून दृष्टीबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करीत आहे. दृष्टीबाधित व्यक्तींच्या सर्वागीण विकासासाठी आणि दृष्टीबाधित निराधार महिलांसाठी मोफत वृद्धाश्रम,18 ते 35 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत टेक्नीकल ट्रेनिंग सेंटर, डोळ्यांच्या विविध आजारांवरील उपचारासाठी अद्यावत हॉस्पिटल इत्यादी विविध प्रकल्प संस्थेमार्फत राबविले जात आहेत.महाराष्ट्र तसेच भारतामधील अनेक दृष्टिहीन व्यक्ती या संस्थेच्या प्रकल्पाच्या लाभार्थी आहेत.