मुंबई | ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रंचंड गाजला. अजुनही या चित्रपटाची चर्चा होत असलेली पहायला मिळते. अशातच प्रसाद ओकने धर्मवीर’ सिनेमा आणि महाराष्ट्रातील सत्तांतर यातील परस्पर संबंध याबाबत मौन तोडले. यावर प्रसाद ओक म्हणाला खरोखर अगदी प्रामाणिकपणे एक सच्चा कलाकार म्हणून सांगायचं तर मला याच्याबद्दल काहीही माहिती नाही. हा सत्तापालट होणार होता की नाही? तो धर्मवीरमुळे झाला की नाही? असं अनेक लोक म्हणतात. पण मला माहिती नाही’.
प्रसाद पुढे म्हणाला की, ‘मी तो एक चित्रपट म्हणून स्विकारला. एकतर अशी कलाकृती वारंवार करायला मिळत नाही. धर्मवीर सारखे चित्रपट 10 ते 15 वर्षे बनत नाहीत. अशी भूमिका सतत वाट्याला येत नाही. जर समोरुन माझ्याकडे आनंद दिघेंची भूमिका येते तर ती जीव तोडून, जीवापाड प्रयत्न करुन ती करणे, त्यांच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे, त्यांच्याकडून तितकंच प्रेम मिळायला हवं’.
‘लोकांचं दिघे साहेबांवर जितकं प्रेम आहे, ते त्यांना दैवत मानतात. त्यांच्या त्या भावनेला कुठे ठेच लागता कामा नये. त्यांच्या भावनांचा आदरच राखला गेला पाहिजे. मात्र सत्ताबदल आणि सत्तानंतर त्याच्यामुळे झालं नाही झालं, याबद्दल बोलणं हा माझा प्रांत नाही. मी त्याकडे कधीही त्या दृष्टीने पाहिलं नाही. असं काही होईल याची आम्हाला एक टक्काही कुठेही जाणीव नव्हती’, असंही प्रसाद ओकनं म्हटलय.