पुणे | ग्रामपंचायतीत वर्चस्वाची लढाई असलेल्या आंबेगाव तालुक्यातील एकूण १८ ग्रामपंचायत निवडणुकींचा आज निकाल जाहीर झाला. त्यात १४ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गटाने वर्चस्व मिळवले, तर शिंदे गटाला तीन ग्रामपंचायतींवर समाधाना मानावे लागले. महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना आणि काँग्रेसला आंबेगाव तालुक्यात भोपळाही फोडता आला नाही.
पुणे जिल्ह्यात आज ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या ६१ ग्रामपंचायतीपैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर ५५ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले, या निकालात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनेच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात शिंदे गटाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे पहायला मिळत आहे.
ग्रामपंचायतीत वर्चस्वाची लढाई असलेल्या आंबेगाव तालुक्यातील एकूण १८ ग्रामपंचायत निवडणुकींचा आज निकाल जाहीर झाला. त्यात १४ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गटाने वर्चस्व मिळवले आहे, तर भाजप आणि शिंदे गटासह शिवसेनेलाही आंबेगाव तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे.
शिंदे गटाला केवळ तीन ग्रामपंचायतींवर यश मिळाले आहे तर भाजपला केवळ एका ग्रामपंचायतीवर यश मिळवता आले असून शिवसेना आणि काँग्रेसला आंबेगाव तालुक्यात खातेही उघडता न आल्याने शिवसेनेला आणि काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे.
त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला असून या निवडणूक निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्या गटाचे वर्चस्व पाहायला मिळाले. बेनके यांच्या गटाने १५ ग्रामपंचायतींवर विजयी मिळवलाय, तर भाजप, शिंदे गट आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेनेला २ तर भाजपला २ ग्रामपंचायतीवर यश मिळाले असून स्थानिक आघाडीला ११ ठिकाणी यश मिळाले आहे तर अपक्षांना ३ ठिकाणी यश मिळाले असून ठिकाणी काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. एकूणच जिल्ह्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचेच वर्चस्व पहायला मिळत आहे.