मुंबई l मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मनसेच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. यावरून ते पक्षविस्तार आणि पक्षबांधणीसाठी तयार असल्याचे दिसून येत आहे.
याच दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनेसेवर खोचक टिका केली ते म्हणाले की, मनसे पक्ष भाजपाचा मित्र होऊ पाहत आहे. राज ठाकरे यांचा पक्ष भाजपाची दुसरी शाखा आहे,
मनसे कडून देखील याचे सडेतोड उत्तर देण्यात आले आहे
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जशास तसे उत्तर देत म्हणाले आहे की, शिवसेना ही शरद पवार यांच्या पिंजऱ्यातील मांजर आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहे, त्याबद्दल शिवसेना काही बोलणार का?
यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे आम्हाला भाजपाची शाखा म्हणत आहेत. आपण स्वत: कोण आहोत हे एकदा शिवसेनेने पाहावे. शिवसेना शरद पवार यांच्या प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यामधील मांजर झाली आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले. शिवसेनेचे संभाजीनगरमधील नेतृत्व खूप जुने झाले आहे. आम्ही आमचा पक्ष वाढवत आहोत. मात्र राष्ट्रवादी शिवसेना संपवत आहे, त्याचं काय? असा खडा सवालही संदीप देशपांडे यांनी केलाय.
अंबादास दानवे यांनी मनसे टिवचले होते व राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणून फिरत होते. तीन-चार महिन्यांपूर्वी त्यांनी भोंग्याचा विषय काढला होता. जिथे भोंगे असतील तिथे हनुमान चालीसा लावणार होते. मात्र, एकाही भोंग्यासमोर हनुमान चालीसा म्हटली गेली नाही, असे अंबादास दानवे म्हणाले.