मुंबई | मातोश्रीवर आज दुपारी उद्योजक गौतम अदानी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट झाली. गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मातोश्रीवरील ही चर्चा कोणत्या विषयावर होती, हे अजून समजू शकलेलं नाही. गौतम अदानी हे जेव्हा केंद्र सरकारचे जवळचे उद्योजक आहेत, असे आरोप होतात, तेव्हा भाजपाच्या विरोधीपक्षातील नेत्यांना गौतम अदानी भेटीला का गेले असावेत हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच ही भेट अशावेळी झाली. जेव्हा आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी काही वेळापूर्वी वर्सोवा सी लिंकवरुन राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून कसं दूर लोटलं जात आहे, असे आरोप करत होते.
वर्सोवा वरळी सी लिंकची जाहिरात चेन्नईत केली जात आहे, पण महाराष्ट्रात का नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात येत आहे.