मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे सुपर सीएम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या रविकांत वरपे यांनी केला आहे. रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो समोर आणला आहे. त्या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून कारभार करत असल्याचा आरोप रविकांत वरपे यांनी केला आहे. यावरून आता वातावरण तापलं आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही श्रीकांत शिंदे यांचे फोटो शेअर करत गंभीर आरोप केला आहे. मेहबूब शेख यांनी फोटो ट्विट करत म्हटलं आहे की, ‘मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. मुख्यमंत्री पदाची गरीमा धुळीस मिळवण्याचे काम हे शिंदे पिता पुत्र करत असल्याचे दिसत आहे. हा कोणता राजधर्म आहे ? बाप नंबरी ,बेटा दस नंबरी ..! याचा अनुभव महाराष्ट्र घेत आहे ..!’