बीड | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री पंकज मुंडे यांची आज एकाच व्यासपीठावर उपस्थिती दिसून आली. बीड जिल्ह्यातील रेल्वेसेवेच्या उद्घाटन समारंभासाठी त्या दोघांनी हजेरी लावली. आष्टी येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री राधाकिशन विखे हे देखील याठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बीड जिल्हावासियांचे गेल्या अनेक वर्षांचे रेल्वेचे स्वप्न आज पुर्ण होत आहे. यानिमित्ताने सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे हे दोघे एकाच हेलिकॉप्टरमधून आष्टी येथे आले. पंकजा मुंडे या पुण्यात होत्या, तर फडणवीस नागपूर येथून पुण्यात आले. त्यांना एकत्र पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काचं बसला. काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये
शीतयुद्ध सुरू होते. त्यामुळे हे संकेत भाजपासाठी चांगले समजले जात आहेत.या कार्यक्रमाला मुख्य एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित लावली.
नारायणडोह – सोलापूरवाडी, लोणी- धानोरा – कडा व आष्टी रेल्वे स्थानके सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहेत. या मार्गावर सहा स्थानके असून आष्टी ते नगर हे अंतर केवळ दोन तासांत पार होईल. या रेल्वेमुळे प्रवाशांसह, व्यापाऱ्यांची देखील मोठी सोय होणार आहे. आता आष्टी येथून बीड आणि नंतर परळी अशा रेल्वे विस्ताराची आशा बीडकरांना आहे.