मुंबई | शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा होणार की नाही याची उत्सुकता सर्वांना लागून राहीली होती. शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमी शिवाजी पार्क येथे होत असतो, पण यंदा शिवसेनेत बंडखोरी करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांनी देखील दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज केला होता.
दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांमध्ये सुरस लागली असताना मुंबई महापालिकेकडून मात्र सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होईल असे कारण सांगत दोघांनाही परवानगी नाकारली गेली होती. शिंदे गटाला बीकेसीमधील मैदानासाठी यापूर्वीच देण्यात आली आहे. मात्र उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला आज परवानगी देण्यात आली आहे.
महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेकडून ओपन चॅलेंज दिले गेले. शिवसेनेचा दसरा मेळावा गनिमी काव्यानं का होई ना शिवतीर्थीवरच होणार असे आव्हान मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.
आता मात्र थेट मुंबई हायकोर्टाकडून शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. शिवसेनेला मुंबई हायकोर्टाकडून दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी देण्यात आली आहे. अखेर ठरले गेले आहे की शिवसेनेचा परंपरा असलेला उध्दव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्क वर घेतला जाणार आहे. शिंदे गटाला बीकेसीमधील मैदानासाठी यापूर्वीच परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे दोघांच्या दसरा मेळाव्याला वेगवेगळय़ा जागी परवानगी मिळाली आहे. दसऱ्याला कोणाचा मेळावा गाजणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.