राज्यात एकीकडे सत्तासंघर्षावरून राजकीय वाद सुरू असतानाच, दुसरीकडे राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नाशिक आणि अमरावती विभागात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागात शिक्षक कोट्याची निवडणूक होणार आहे. १ नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होईल तर ३० डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. एकूण पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
१ नोव्हेंबर २०२२ पासून होणार नवीन मतदार नोंदणी
१ ऑक्टोबर से ७ नोव्हेंबर दरम्यान पदवीधर व शिक्षक मतदारांची नोंदणी
२३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार
२३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणार
३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार