अहमदनगर | शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यातच शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित झाला असून त्यात सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. ही लढाई दुर्दैवी असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव चालतं, बाकी सगळं काही चालतं मग बाळासाहेबांसाठी सर्वस्व असलेलं मुलगा आणि नातू त्यांना का चालत नाही? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे. पारनेरमध्ये आमदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एक लाख महिलांची मोहटा देवी दर्शनाची मोफत बस सेवा सुरू करण्यात आली. त्याच्या उद्घाट्नाला सुप्रिया सुळे अहमदनगरला आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
जर तुमच्यात मतभेद असतील तर तुम्ही दुसरं घर करा तुम्हालाही शुभेच्छा. परंतु, अशाप्रकारे ठाकरे कुटुंबावर आरोप करणं चुकीचं असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलंय. शरद पवार यांच्यावर ज्यावेळेस काँग्रेसने कारवाई केली, त्यावेळेस साहेबांनी स्वतंत्र पक्ष काढून उभे राहिले त्यावेळेस त्यांनी काँग्रेस माझी आहे, त्यातील माणसं माझी आहे असे म्हटले नाही. सध्याचे राजकारण पाहून बाळासाहेबांना खूप वेदना होत असतील असेही सुप्रिया म्हणाले.