मुंबई | महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गट प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. शिवसेना पक्ष खरा कोणाचा, या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नसेल, असा निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘न्यायदेवतेवर, न्यायव्यवस्थेवर सर्वांना विश्वास आहे, ते लोकशाहीचा एक स्तंभ आहे, त्यामुळे मला असं वाटतं की या निर्णयाबाबत पुढे काय होतं ते पाहू’, असं त्या म्हणाल्या.
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपला एकत्र पाहण्याची सर्वांची इच्छा आहे, तसं होईल असं वाटतं का, या प्रश्नावर अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘देवाच्या कृपेने जे व्हायचंय ते होतंच, माझी वैयक्तिक इच्छा आहे की भाजपची सत्ता महानगरपालिकेत यावी. त्यामागे प्रगतीचं राजकारण आहे.’