पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये आंतरिक घडामोडींचा वेग आला आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपण ही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होत. मात्र ते काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल,अशी चर्चा आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपद सापडल्यास सचिन पायलट हे राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री असू शकतात, अशीही चर्चा आहे. याच चर्चेदरम्यान पायलट यांना विरोध करत गेहलोत गटाच्या 82 आमदारांनी बंडाचा इशारा देत राजीनामे लिहिले.
आमदारांच्या या बंडाला गेहलोत जबाबदार असल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर पक्षाने अनुशासनहीनतेचा ठपका ठेवल्याचं बोललं जात आहे. यावरच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. कमलनाथ म्हणाले आहेत की, माझे दोन्ही नेत्यांशी (सचिन पायलट आणि अशोक गेलोत) चांगले संबंध असल्याने मी त्यावर भाष्य करणार नाही. ते म्हणाले की, अनुशासनहीaनतेबाबत मी अशोक गेहलोत यांच्याशी बोललो असून दोषी नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.