मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचं 12 मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे.