मुंबई | दसरा मेळावा सध्या चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. एकीकडे ठाकरे गट तर दुसरीकडे शिंदे गट. दसरा मेळाव्यासाठी जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न केले जात आहे.
दसरा मेळाव्यासाठी गर्दीची शर्यत कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या दोन्ही मेळाव्यांमध्ये होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणांची प्रचंड उत्सुकता अनेकांना लागली. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही भाषणं ऐकणार नसल्याचे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस हे बुधवारी नागपूर येथे धम्मचक्र परिवर्तन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम दसरा मेळावा सुरु असतानाच होणार आहे. त्यामुळे मला दसरा मेळाव्यातील दोन्ही भाषणं ऐकता येणार नाहीत.
कायदा व सुव्यवस्थेला कोठेही बाधा येणार नाही. दोन्ही गटांच्या सभा शांततेत पार पडाव्या यासाठी पोलीस मोठ्या संख्येने तैनात असतील. भाषण करा पण कायद्याच्या चौकटीत राहून बोला असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.