पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बारामती लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते मनसेत दाखल झाले आहेत. छावा संघटनेचे आप्पा आखाडे, नऱ्हे-आंबेगाव परिसरातील समीर कुटे, भोर तालुक्यातील केळवडे गावातील रोहित वाल्हेकर, वारजे परिसरातील संदीप तांगुदे यांनी मनसेत प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे भाजपने यापूर्वीच लक्ष ठेवले आहे. त्यानुसार, भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडे बारामतीची जबाबदारी सोपवली आहे. भाजपनंतर आता मनसेचा डोळाही बारामती मतदारसंघाकडे लागला आहे. त्यानुसार, छावा संघटनेचे आप्पा आखाडे, नऱ्हे-आंबेगाव परिसरातील समीर कुटे, भोर तालुक्यातील केळवडे गावातील रोहित वाल्हेकर, वारजे परिसरातील संदीप तांगुदे यांनी मनसेत प्रवेश केला आहे. या सर्व कार्यकर्तांची ताकद मोठी असून, याचा फायदा मनसेला होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, बारामती मतदारसंघाकडे भाजप त्यानंतर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि आता मनसे या पक्षांनी ताकद लावण्याचे ठरवल्याने आगामी लोकसभा निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे सांगितले जात आहे.