मुंबई : कोरोनामुळे गेली दोन वर्षे दहीहंडीचा उत्सव साजरा करता आला नाही. यावर्षी दहीहंडी उत्सवानिमित्त नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. आणि यानिमित्ताने राजकीय टोलेबाजीही सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठाकरे यांना टार्गेट केले जात असूल्याबाबत शिवसेनेचे युवा नेते अदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी आजचा दिवस आनंदाचा आहे. कोणताही मॅच्युअर व्यक्ती आज राजकारणावर बोलणार नाही. आज आनंद साजरा करुया राजकारणासाठी भरपूर वेळ आहे, असा टोला अदित्य यांनी हाणला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका दहीहंडी उत्सवात हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी आपण ५० थर लावून सर्वांत मोठी राजकीय हंडी फोडल्याचे म्हटले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही ठाकरे यांचा नामाल्लेख न करता टोलेबाजी केली. त्यावर पत्रकारांनी अदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
दहीहंडीचा दिवस हा आनंदाचा दिवस असून कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्सुकतेने आजच्या दिवसाची वाट पाहात असतात. आणि अशा आनंदाच्या दिवशी कोणताही मॅच्युअर व्यक्ती राजकारण करणार नाही. आणि तसं जर कोणी करीत असेल तर, तो बालिशपणाचं असेल, असेही अदित्य ठाकरे म्हणाले.