बुलढाणा | गेल्या काही दिवसापासून राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. या राज्यापालांना कुठेही न्या. पण हे राज्यपाल महाराष्ट्रात नको अशी मागणी शिंदे गटातील एका आमदारांनी केली आहे. महाराष्ट्राला समजून घेणारेच राज्यपाल आम्हाला हवे आहेत असेही ते म्हटले आहे.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपला अशी विनंती केली आहे. ज्या राज्यपालांना आपला इतिहास माहिती नाही. ज्याला राज्याचे राज्य काय आहे हे कळत नाही. अशा माणसाला आपल्या दिलदार मनाच्या राज्याच्या पदावर ठेवू नये. यासाठी महाराष्ट्राच्या मातीतला मराठी माणूस राज्यपदावर बसवा. ह्या राज्यपालांना कुठे पाठवायचं आहे तिथं पाठवा असे गायकवाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणाला सुभाष चंद्र, कोणाला नेहरु, कोणाला गांधीजी चांगले वाटत असत. ज्याला जी व्यक्ती चांगली वाटत असेल तो त्या व्यक्तीचे नाव घेत असत. आज तुम्हाला आदर्श शोधायचे असतील तर कोठे बाहेर जाण्याची मुळीच गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातच आपले आदर्श शोधू शकतात. जर तुम्हाल कोणी विचारले तुमचे हिरो कोण? तर मला वाटते तुम्हाला ते इथेच मिळती. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले. त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.