मुंबई : ‘शिवसेना कोणाची’ यासंदर्भातील मागील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होईल असे सांगितले होते. मात्र, आज होणारी सुनावणी ही परवा म्हणजे 23 ऑगस्टला होणार आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती उद्या उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेली आहे असे सांगितले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी 4 ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून शिवसेना कुणाची यासंदर्भात निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरू आहे.
उद्धव ठाकरे गटाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. आयोगाने त्यांना दोन आठवड्यांचा वेळ दिला. 23 ऑगस्टला याची मुदत संपते आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग अशा दोन्ही आघाड्यांवर 23 तारखेला म्हणजे उद्या सुनावणी होणार आहे.