मुंबई | राज्याच्या राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सातत्याने सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे.
या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला त्यांच्यात प्रचंड नाराजी दिसून येत आहे तर, दुसरीकडे शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली असून आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.
निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाविरोधात ठाकरे यांनी काल तातडीची बैठक बोलवली होती. त्यानंतर आज देखील उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत पुढील पक्षाची भूमिका काय असेल? त्याचबरोबर पुढील रणनिती काय असेल यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.