मुंबई | सध्या राज्याचे राजकारण आरोप प्रत्यारोपांनी ढवळून निघाले आहे. त्यामध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. तेव्हापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आहे. त्यातच आता खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीवावर आरोप केले आहे.
राऊत यांनी एक पत्र ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ल्याचा कट आखल्याचा संजय राऊत यांनी पत्रात दावा केला आहे.
दरम्यान, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजा ठाकुरला आपल्यावर हल्ला करण्याची जबाबदारी दिली आहे. लोकप्रतिनिधी असून अलीकडेच राज्य सरकारने माझे पोलीस संरक्षण काढल्याचा निर्णयाबाबतही संजय राऊत यांनी पत्रात लिहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त यांना देखील पत्र लिहले आहे.