पुणे | सध्या राज्यामध्ये कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागून राहिले आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या पोटनिवडणुकीमध्ये सक्रीय झाले आहेत. या मतदारसंघात भाजप-शिवसेना युती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होताना दिसत आहे. दोन्ही पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
एकनाथ शिंदे यांनी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यातील स्वारगेट येथील शिवसेना भवन येथे मध्यरात्री बैठक घेतली. यावेळी आमदार भरत गोगावले, प्रवक्ते नरेश म्हस्के, पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, अजय भोसले यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
कसबा मतदारसंघ शिवसेना भाजप युतीचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी आमचे उमेदवार हेमंत रासने 100 टक्के प्रचंड बहुमताने जिंकणार आहे, असा विश्वास यावेळी शिंदेंनी व्यक्त केला.
दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी भगवं वादळ पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेना-भाजप महायुती कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा 100 टक्के आणि प्रचंड मतांनी जिंकणार, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.