मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक घटना घडताना दिसत आहे. त्यामध्ये अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलच तापल आहे. त्यातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाचं कनेक्शन मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी जोडलं आहे.
मुखेड याठिकाणी अंधारेंची महाप्रबोधन यात्रेनिमित्त सभा झाली. यावेळी त्यांनी फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधत त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केला आहे.
यावेळी बोलताना, उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय कोणाच्या जागेत आहे? याचा शोध घ्या. किरीट भाऊंनी याचा शोध घ्यावा. ज्या अनिल जयसिंघानीच्या नावाने आरोप केले जात आहेत. त्यांच्याच जागेत श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय कसं काय? ती जागा कोणाची, कोणाच्या नावावर आहे, त्याची खरेदी विक्रीची कागदपत्रं तपासा. जयसिंघानी यांची जवळीक कोणाशी? याचा तपास झालाच पाहिजे. असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.