मुंबई | देशातील राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे देशाच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेसचे जुने आणि जाणते जेष्ठ नेते आज काँग्रेस सोडून बाहेर पडत आहेत. यामुळे काँग्रेसला मोठा झटका मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गुलाम नबी आझाद यांच्यात काही कारणांवरून वादाचे प्रसंग ओढवले होते. त्यामुळे गुलाम नबी आझाद काहीसे नाराज देखील असल्याचं समजत आहे. काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू असताना गुलाम नबी आझाद यांनी दिलेला हा राजीनामा खळबळजनक आहे. त्यांच्यासोबत आणखी काही राजीनामे देणार का याची देखील चर्चा होत आहेत.