पुणे | संस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात 35 वर्षीय व्यक्तीचा नदी पात्रात खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भिडे पुलाजवळील असलेल्या नदी पात्रात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गणेश कदम असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून हत्या झालेल्या तरुणाच्या गळ्यावर वार केले आहेत. नातेवाईकांच्या मदतीने मृत तरुणाची ओळख पटली असून गणेशची हत्या पूर्व वैमनस्यातून झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.