पुणे | जिल्हा क्रीडा परिषद व लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल फुलगाव, पुणे आयोजित योगासन स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि.28) झाला. या स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी सी. एस, स्वामी, लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक नरहरी पाटील, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य डेन सिंग, टेन टी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य शॉपीमॉन व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगातज्ञ रमेश भालेराव होते. क्रीडा अधिकारी स्वामी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व आणि आरोग्याविषयीची माहिती देत शुभेच्छा दिल्या.
योगासन स्पर्धेचे पंच म्हणून रमेश भालेराव व धनश्री पाटील यांनी योगदान दिले. या स्पर्धेचे आयोजन अर्जुन शिंदे, तानाजी पाटील व विनायक वऱ्हाडे यांनी केले तर शाळेच्या सर्व क्रीडाशिक्षकांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले.