पर्यषण पर्वानिमित्त उल्लेखणीय सेवा केलेल्या मान्यवरांचा सत्कार
पुणे : साधु, साध्वी व समाज सेवा कार्याबद्दल आदेश खिंवसरा यांचा विशेष सेवा शिरोमणी पुरस्कार व संदीप पारेख यांचा सेवा शिरोमणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या विशेष कार्याबद्दल डॉ. प्रदीप बाफना व डॉ. राजन कोठारी आणि दैनिक सकाळचे वृत्तसंपादक धनंजय बिजले यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
जीतो पुणे आणि साधना सदन यांच्या वतीने श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ द्वारा महावीर प्रतिष्ठान येथे सुरु असलेल्या प.पु. तपस्वी गौतम मुनिजी म.सा., प.पु. तपस्वी चेतन मुनिजी म.सा. महाराज यांच्या चार्तुमास मध्ये पुणे शहर भाजपा लोकसभाचे प्रभारी श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, प्रकाश धारीवाल, रमनलाल व आशाबाई लुंकड, जीतोचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, जीतोचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो महाराष्ट्रचे अध्यक्ष अजित सेेठिया, पंकज कर्णावट, जीतो पुणेचे अध्यक्ष राजेश सांकला, मुख्य सचिव चेतन भंडारी, मनोज छाजेड, ललीत शिंगवी, पुणे जैन संघाचे विजयकांत कोठारी, लखीचंद खिंवसरा, विजय धोका, अरुण शिंगवी, रायचंद कुंकुलोल, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. चातुर्मासमध्ये सुरु असलेल्या प्रवचन व प्रार्थनेचा श्रावक-श्राविका आणि भाविक लाभ घेत आहेत. यावेळी जैन धर्मातील प्रतिकमण विधी होत आहेत.
चातुर्मासातील हे आठ दिवस पर्युषण पर्वाचे असून ते अत्यंत महत्वाचे असतात. या आठ दिवसांमध्ये अनेक भाविक तप साधना करतात. पर्युषण पर्वामध्ये गुरुदेवचे आठ उपवास तसेच १०० हुन अधिक श्रावक-श्राविकांचे आठई तप सुरु आहेत. या सर्व तपस्वींच्या भेटीसाठी व गुरुदेवचे आर्शीवाद घेण्यासाठी पुण्याचे खासदार आणि केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ उपस्थित होते. यावेळी उल्लेखणीय सेवा केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
प्रत्येकाने स्वतःच्या घरात संस्काराचा दिवा लावा
पृथ्वीवर आपला जन्म माणूस म्हणून झाला हे आपले भाग्य आहे. आपण सर्व केवळ यात्री असून भगवान महावीरांच्या विचारांवर आपण चाललो तर, आपल्याला कर्माची चांगली फळं मिळतील. इतर कर्म करताना आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याची आणि कुटुंबाला बाहेरच्या शक्तींपासून जपण्याची आजच्या काळात नितांत आवश्यकता आहे. आपले कुटुंब, नातेवाईक यांना प्रेमाने, आपुलकीने एकमेकांशी जोडून प्रत्येकावर चांगले संस्कार होतील याची खबरदारी घ्यायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या घरात संस्काराचा दिवा लावा. आपले आई-वडीलच आपले गुरु आहेत. पत्नी आपले धाडस आहे तर, मुलं ही आपले भविष्य आहे.
-प.पू. गौतम मुनिजी म.सा.