पुणे : माँ आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट व लायन्स पुना गणेश खिंडच्या वतीने, गांगाधम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिरात आज दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी ‘दिवाळी पहाट’ सोहळ्याचा पारंपारिक उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पहाटेच्या वेळी मंदिर परिसर फुलांच्या माळांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आला होता, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला. तसेच अनेक भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार या पवित्र सोहळ्यात सहभाग घेतला. मंदिरात येणाऱ्या काही भाविकांची लकी ड्रॉ मधून नावे काढण्यात आली. ज्यांना सहकुटुंब सहपरिवार माँ आशापुरा माताच्या आरतीचा लाभ मिळाला.
सोहळ्याची सुरुवात पहाटे ५ वाजता शंख नाद करत देवीचे द्वार उघडुन व देवीची आरती करून करण्यात आली. ज्यामुळे मंदिराचा परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला. यावेळी माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे प्रमुख व जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी व ट्रस्टचे चेतन भंडारी, लायन्स क्लब ऑफ पूना गणेश खिंडचे अध्यक्ष शैलेश खंडेलवाल, इंदरकुमार छाजेड, मनोज छाजेड, भारती भंडारी, लीना भंडारी, पूनम ओसवाल, प्रियंका परमार, यांसह अनेक भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच या सोहळ्यासाठी श्याम खंडेलवाल,राजेंद्र गोयल, मंगेश कटारिया, दिलीप मुनोत व टीमने विशेष योगदान दिले.या सोहळ्यात संगीत व भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. ज्यामध्ये ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘रेकॉर्ड ऑफ यूके’ विजेते विवेक पांडे, प्रतिशा पांडे आणि गीतांजली यांनी आपल्या सुरेल आवाजात भजन व भक्तिगीते सादर केली, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसाने न्हाऊन गेले. त्यानंतर प्रसाद म्हणून मिठाईचे वाटप करण्यात आले. दिवाळी पहाट सोहळ्याने मंदिर परिसरात दिवाळीच्या आगमनाची सुरुवात भक्तिमय वातावरणात झाली असून, श्रद्धाळूंनी मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने या सोहळ्यात सहभाग घेतला. माँ आशापुरा मातेच्या चरणी दीप प्रज्वलित करत, भक्तांनी आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यावेळी ट्रस्टचे प्रमुख विजय भंडारी यांनी, दरवर्षी माँ आशापुरा माता मंदिरात ‘दिवाळी पहाट’ चा सोहळा मोठा उत्साहात पार पाडतो. तसेच यावर्षी आग्रहाने हा सोहळा 30 ऑक्टोबरला रोजी घेतला. कारण, दिवाळी निमित्ताने अनेकजण आपल्या गावी निघून जातात. त्यामुळे त्यांना माँ आशापुरा माता मंदिरातील ‘दिवाळी पहाटच्या’ या सोहळ्याचा लाभ मिळावा म्हणून यावर्षी सोहळा लवकर ठेवण्यात आला असे सांगत सोहळ्यासाठी उपस्थित सर्व भाविकांचे आभार मानले.