मुंबई : भारत आणि न्यूझीलंड मधील शेवटचा व निर्णायक असणाऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व भारतीय संघाने २० षटकात ४ गडी गमावून २३४ धावा केल्या. यामध्ये शुभमन गिलने शानदार फलंदाजी करताना टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
त्याने हे शतक ५४ चेंडूत केले. शुभमनने ६३ चेंडूंत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद १२६ धावा केल्या. व न्यूझीलंड समोर २३५ धावांचे लक्ष दिले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १२.१ षटकांत ६६ धावांवर आटोपला.
भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी या वेगवान गोलंदाजानी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडणे सेपे झालेत्यामुळे भारतीय संघाने २-१अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली. भारताने तिसरा टी 20 सामना विक्रमी 168 धावांनी जिंकला.