नवी दिल्ली | दिल्लीत झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने अवघ्या तीन दिवसात सामना संपवला. हा सामना भारतीय संघाने ६ गडी राखून जिंकला. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात मालिकेतील सलामीवीर रोहित शर्मा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार नाही. अशी माहिती ‘बीसीसीआय’ने दिली आहे. तर, या सामन्यात त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला वनडे सामना 17 मार्चला मुंबईत होणार आहे. यानंतर दुसरा वनडे सामना 19 मार्चला विशाखापट्टणममध्ये तर, तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 22 मार्चला चेन्नईत खेळला जाणार आहे. याआधी मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये 1 मार्चपासून तर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.