अहमदनगर येथे झालेल्या विभागीय फुटबॉल स्पर्धेमध्ये पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेने विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या खेळाडूंनी अहमदनगर सिटी संघाचा 6-0ने पराभव केला. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विजयी संघाचं व फुटबॉल प्रशिक्षक तानाजी पाटील व राहुल हरगुडे यांचं लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी विशेष अभिनंदन केलं व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांनी देखील विजयी संघाला शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी शाळेच्या संघातील खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख व फुटबॉल प्रशिक्षक तानाजी पाटील व राहुल हरगुडे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. यासह नेताजी सुभाष चंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलचे प्राचार्य अमर क्षीरसागर, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी शॉपीमोन, उपप्राचार्य विकास तिरकुंडे, सुरेश पाटील व प्रशासकीय अधिकारी पांडुरंग जगताप यांनीही मुलांना मार्गदर्शन केलं. सर्वांनी विजेत्या संघाला पुढील आठवड्यात बालेवाडी इथं होणाऱ्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.